उसपचे सरपंच दिनेश नाईक पुन्हा निवडणूक रिंगणात | थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सदस्य पदासाठी केला उमेदवारी अर्ज दाखल

आपणच नाही, थेट महिला सरपंच सुद्धा आमच्याच पॅनल मधून निवडुन आणणार : दिनेश नाईक
Edited by: संदीप देसाई
Published on: December 01, 2022 21:37 PM
views 165  views

दोडामार्ग: सर्वांचे लक्ष लागलेल्या उसप गावच्या रणसंग्रामात मागील निवडणूक मध्ये थेट सरपंच म्हणून निवडून आलेले सरपंच दिनेश नाईक यांनी यावेळी सुद्धा सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंचायत समिती सदस्य बाळा नाईक यांच्या सोबतीनं त्यांचे विरोधक प्रकाश गवस यांच्या पॅनलला धोबीपछाड करण्यासाठी सुरवाती पासूनच खास व्युवरचना आखली आहे.

 गेल्या पाच वर्षात युवा व अभ्यासू सरपंच म्हणून दिनेश नाईक यांनी केलेलं काम लक्षवेधी राहील. अनेक बाजूनी सातत्याने कडा विरोध राहूनही त्यांनी विरोधकांना थारा न देता उसप गावी विकास कामांचा धडाका लावला होता. प्रकाश गवस व त्यांचा गट सातत्याने दिनेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत होता. सातत्याने या ना त्या कारणावरून दिनेश नाईक यांना त्या गटांन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर मात करत दिनेश नाईक यांनी विरोधकांना वेळोवेळी आपल्या चोख कामगिरीने चितपट केलं . आणि आता पुन्हा थेट निवडणूक मध्ये स्वतः सदस्य पदासाठी उतरून त्यांनी विरोधकांना कडवे आव्हान दिलंय. आपणच नाही थेट महिला सरपंच सुद्धा आमच्याच  पॅनल मधून निवडुन आणणार, आज विरोधकांना उमेदवार शोधण्यासाठी धडपड करावी लागतेय यातच त्यांचं अपयश असल्याचे कोकणसादशी बोलताना स्पष्ट केलंय.  त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सदस्य पदासाठी उमेदवारी दाखल करून आपला स्ट्रॉंग इरादा स्पष्ट केलाय. आपण केलेला विकास आणि भविष्यात चौफेर विकासाचे व्हिजन आपल्याला यश मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.