'ऊरी दाटला पाऊस' अल्बमचं रविवारी प्रकाशन

Edited by: ब्युरो
Published on: September 02, 2023 23:10 PM
views 288  views

कणकवली: पाऊस ही प्रत्येकाच्या मनातील एक हळवी गोष्ट !!पडणारा पाऊस सगळीकडे पडत असला तरी सुद्धा पावसाची आपल्यानुसार वेगवेगळे रूप प्रत्येक जण अनुभव असतो. पाऊस संगीत देतो, आनंद देतो हीच प्रेरणा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत प्रेमी नी "ऊरी पाऊस दाटला" या गाण्यांच्या अल्बम चे आयोजन केले आहे. या अल्बमचे प्रकाशन रविवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे सायंकाळी पाच वाजता आयोजित केले आहे. आनंदाश्रय वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक बबन परब यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन होईल.

अभिनेते निलेश पवार यांनी या अल्बम मध्ये  गीतं आणि कविता लिहिली आहेत. धीरेश काणेकर आणि अर्थ कुमार यांच्या आवाजात ही गाणी ध्वनीमुद्रित झाली आहेत. सिंधुदुर्गातील मनोज मेस्त्री ,शाम तेंडुलकर शशिकांत कांबळी, धीरेश काणेकर आणि मकरंद कदम या संगीतकारांनी या गाण्याला आपल्या संगीताने सजवल आहे. संगीत संयोजन धीरेश काणेकर, मकरंद कदम आणि शशिकांत कांबळी यांचं आहे. या अल्बमच्या प्रकाशनानंतर त्यातील गाणी रसिकांच्या भेटीला त्याच ठिकाणी सिंधुदुर्ग चा लाडका गायक धीरेश काणेकर यांच्या आवाजात ऐकायला मिळतील. चार तारीख नंतर नावाजलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्व रसिक या गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतील तरी या कार्यक्रमाला सर्व रसिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे.