
कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकातील सुशोभिकरण करण्यात आलेल्या सिलिंगच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी सुमाराच्या घडली होती. दरम्यान, याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दखल घेत सदर सिलिंगची तातडीने दुरूस्ती करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचार्यांनी रेल्वे स्थानकात धाव घेऊन सिलिंग दुरुस्तीचे काम हाती घेतले. सायंकाळनंतर सिलिंग सुस्थितीत झाले. दरम्यान, खबरदारी म्हणून उर्वरित सिलिंगची तपासणी करण्याची सूचना मंत्री राणे यांनी बांधकाम विभागाला दिली आहे.