उपरलकर देवस्थानचा उद्या वार्षिक अभिषेक साेहळा !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2024 07:36 AM
views 44  views

सावंतवाडी : महाराष्ट्र व गाेवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व 365 खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा साेहळा गुरुवार 1 फेब्रुवारी  2024 राेजी साजरा हाेणार आहे.

सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी माेठा उत्सव म्हणून साजरा हाेताे. यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. गुरुवार 1 फेब्रुवारी राेजी सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद,नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम  हाेणार आहे.  तर सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयाेग हाेणार आहे.

या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम  नाईक शितप यांनी केले आहे.