
वेंगुर्ले : जगभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवून जनसेवा सेवा देण्यास कार्यरत असलेल्या रोटरी क्लबच्या व्हिल या चिन्हाचे प्रथमच वेंगुर्ले शहरातील चारही सीमांवर अनावरण रोटरीचे प्रांतपाल नासिरभाईं बोरसादवाला यांच्या हस्ते झाले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने रोटरी क्लबची जनसेवा या भागात उपलब्द आहे. हे दर्शविणासाठी वेंगुर्ला शहराच्या सीमांवर उभारलेल्या रोटरी व्हीलचे अनावरण प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिरभाई बोरसादवाला, सचिन वालावलकर, सोबत प्रेसिडेंट शंकर उर्फ राजू वजराटकर, वासुकी सानजी, प्रसन्ना देशिंगकर, राहुल कुलकर्णी, गौरव शहा, ऋषिकेश खोत, दिलीप गिरप, योगेश नाईक, मानसिंग पानसकर, दादासाहेब कडोलकर, दिलीप शेवाळे, डॉ सतिश इरकल, इव्हेंट चेअर राजेश घाटवळ, प्रा.वसंत पाटोळे, दादा साळगावकर आदी रोटरीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.