
कुडाळ : अवघ्या सिंधुदुर्गवासियांना उत्सुकता लागुन राहीलेल्या 'शिवगर्जना' या महानाटयाला अखेर विशाल जनसागराच्या साक्षीनं शानदार प्रारंभ झाला. सिंधुदुर्ग भाजप आणि विशाल सेवा फाउंडेशल यांच्यावतीनं भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महानाटयाला 'न भुतो न भविष्यती' अशी रसिक प्रेक्षकांची गर्दी जमली. या 'विशाल' जनसागराच्या साक्षीनं शाहीरांनी डफावर थाप टाकत या ऐतिहासिक महानाटयाला प्रारंभ केला. जय शिवाजी जय भवानीचा जयघोष आसमंत दणाणुन सोडत होता. दिग्गज मान्यवरांची या महानाटयाला उपस्थिती आहे. या ऐतिहासिक आयोजनाबददल सर्वच जण विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांना धन्यवाद देत आहेत. गर्दीचे सारेच विक्रम मोडत या महानाटयाचा आस्वाद रसिक घेत आहेत.