
सावंतवाडी : कुणकेरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुनील परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाजप नेते, जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या उपस्थितीत उपसरपंचपदाचा पदभार त्यांनी स्वीकारला. यावेळी सरपंच सोनीया सावंत, संतोष राऊळ, शिवाजी परब, बाळा सावंत, योगेश गवळी, कृष्णा मेस्त्री, राजन धुरी, राजन मडवळ आदी उपस्थित होते.