
वैभववाडी : नावळे गावच्या उपसरपंच पदी भाजपचे संजय रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे .निवडीनंतर त्यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी अभिनंदन केले आहे.
नावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची आज निवडणूक होती.या पदाकरिता श्री .रावराणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासह दोन सदस्य पदाकरीता निवडणूक झाली होती. उर्वरित जागा या बिनविरोध झाल्या होत्या.सरपंचपदी शिंदे गटाच्या सोनल गुरव या निवडून आल्या होत्या. मात्र आजची उपसरपंच पदाची निवड ही बिनविरोध झाली. यावेळी भाजपचे जुने पदाधिकारी संजय रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांच पुष्पगुच्छ देऊन प्रमोद रावराणे यांनी अभिनंदन केले.यावेळी वैभववाडी उपनगराध्यक्ष संजय सावंत,रमेश गुरव, शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी रावराणे,ताता रावराणे, गजानन पाटील यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते .