सिंधुदुर्ग ग्रंथालय संघाच्या संचालकपदी 21 जणांची बिनविरोध निवड

Edited by: विनायक गावस
Published on: October 17, 2023 18:38 PM
views 277  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालकपदी 21 जणांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यात विद्यमान अध्यक्ष आनंद वैद्य, सचिव मंगेश मस्के, सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड संतोष सावंत तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव व कवी विठ्ठल कदम कोकण मराठी साहित्य परिषदेचे खजिनदार तथा नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य भरत गावडे, कवी रू जारिओ पिंटो, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे महेश बोवलेकर, नंदन वेंगुर्लेकर, राजन पांचाळ, संजय शिंदे, धाकू तानावडे, ऋतुजा केळकर, उषा आठलये, प्रवीण भोगटे, सतीश गावडे, प्रसाद दळवी, भार्गव राम धुरी, गुरुनाथ मडवळ, जयेंद्र तळे कर, दीक्षा परब यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरविंद शिरसाट व श्री परब यांनी काम पाहिले. जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 15 ऑक्टोंबरला कुडाळ येथील रा ब अनंत शिवाजी देसाई टोपीवाले वाचनालय व ग्रंथ संग्रहालय येथे

घेण्यात आली. या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. येत्या 22 ऑक्टोबरला नवीन जुन्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी निवड होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आनंद वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा ग्रंथालय संघाची चळवळ व्यापक पद्धतीने वाढवणे व शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे जिल्ह्यातील ग्रंथालयाच्या समस्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे शासनाने ग्रंथालय चळवळीसाठी ई प्रणाली अमलात आणली आहे. त्याबद्दलही सविस्तर चर्चा करण्यात आली. नवीन कार्यकारणी निवड झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.