होमगार्डची सेवा बेकायदेशीरपणे स्थगित ; पंकज देसाई यांचा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा

Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 16:07 PM
views 113  views

सावंतवाडी : आस्थापनेत आठ वर्षापेक्षा जास्त काळ होमगार्ड म्हणून काम केले आहे. परंतु अचानक २०१७ नंतर आपली सेवा बेकायदशीरपणे स्थगित करण्यात आली. आपल्याला तात्काळ सेवेत रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी केर येथील पंकज तुकाराम देसाई यांनी जिल्हा समादेशक (होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग) यांच्याकडे केली आहे. सेवेत समाविष्ट करून न घेतल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हा समादेशक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही देसाई यांनी दिला आहे.


जिल्हा समादेशकांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, होमगार्ड आस्थापनेत आठ वषपिक्षा जास्त काळ होमगार्ड म्हणून सेवा दिली आहे. २०१७ मध्ये माझे ओळखपत्र व गणवेश पथक प्रमुख दिला आहे. बांदा यांच्याकडे जमा करून घेत माझी सेवा अचानकपणे स्थगित करण्यात आली. वास्तविक माझी कोणतीही चूक नसताना अशाप्रकारे अचानक मला सेवा समाप्तीचा आदेशही न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. हे पूर्णत: बेकायदेशिर आहे. यामुळे आपल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळोवेळी समादेशक कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही कामावर रुजू करून घेण्यात आलेले नाही. याबाबत माहितीच्या अधिकाराखाली सविस्तर माहिती मागवली असता अर्धवट व विसंगत माहिती देण्यात आली. मला तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हा समदेशक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही देसाई यांनी दिलाय.