अनोखा हळदी कुंकू...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 12, 2024 14:12 PM
views 47  views

सावंतवाडी : एक तरी झाड लावा या संकल्पनेतून तुळशी वृंदावनाचे रोप देऊन आगळावेगळा हळदीकुंकू सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पदी आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या सुविद्य पत्नी. श्रेया आडीवरेकर  उपस्थित होत्या. माठेवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 15 च्या अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार हिच्या हस्ते वाण म्हणून हे तुळशीचे रोप देऊन हळदीकुंकू साजरा करण्यात आला.

हा आगळावेगळा हळदी कुंकू असून हळदी कुंकवाच्या समारंभामध्ये सुवासिनी महिला येणाऱ्या महिलांना  तिळगुळ देऊन आणि हळद कुंकू लावून काही ना काही वस्तू दिली जाते.  जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मधील अंगणवाडीच्या वतीने साजरा करण्यात आला. प्रत्येकाच्या दारासमोर असलेले तुळशीचे रोप असावे  म्हणून वाण देऊन साजरा करत हळदीकुंकू साजरा केला तुळशी वृंदावन म्हणजे स्त्रीची सखी असते त्यामुळे हा हळदी कुंकू साजरा करण्याचा  स्तुत्य उपक्रम असल्याचे सौ श्रेया आडीवडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तर अंगणात एक तरी रोप लावा त्यात तुळस दारात लावा असा संदेश देण्यासाठी हा तुळशीचे रोप देऊन हळदी कुंकवाचे वाण देण्याचा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार यांनी सांगितले. तुळशीचे रोप प्राणवायूची निर्मिती करते त्यामुळे घराचा परिसर हा आरोग्य व पर्यावरणदृष्ट्या हेल्दी राहतो तुळस ही आयुर्वेदिक आहे. तिचे अनेक उपयोग आहेत . त्यामुळे हळदीकुंकवाचे हे वाण प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासमोर लावावे त्याची अनेक रोपे घराच्या सभोवताली लावावे हा या मागचा उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या यावेळी अंगणवाडीच्या पालक सौ रुचिका कदम यांनी मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकू समारंभास

अंगणवाडीच्या मदतनीस अमिषा सासोलकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका चैत्राली गवस शिक्षिका भक्ती फाले,प्राची ढवळ पूजा ठाकूर,सपना विरनोडकर समीखा भिसे सौ  तोरस्कर  नेहा प्रभू रुची नाईक भावना किटलेकर तसेच छोट्या बालकांमध्ये वैष्णवी चव्हाण स्निग्रा प्रभू सुकम करमळकर जानवी मेस्त्री तनया शिरसाठ वेदांश कदम दक्ष राऊळ रिद्धिमा किटलेकर अल्फा शेख गुरुराज केसरकर रोहित मुंज चिराग विरनोडकर आदी सह छोटी मुले यावेळी उपस्थित होती.