विशाल परबांच्या वाढदिवसाला केंद्रीय मंत्र्यांची असणार हजेरी

राज्यातील बडे नेतेही एकाच व्यासपीठावर
Edited by: विनायक गावस
Published on: October 14, 2023 18:05 PM
views 577  views

सावंतवाडी : भाजपा नेते,युवा उद्योजक विशाल परब यांचा उद्या होणाऱ्या वाढदिवसाला केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे, खा.भागवत कराड, खा.श्रीपाद नाईक यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री आ.दीपक केसरकर, उद्योगमंत्री आ.उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे,गोव्याचे खासदार सदानंद तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ.प्रमोद जठार, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहीती भाजपा पदाधिकारी व विशाल परब मित्रमंडळाकडून देण्यात आली.

जिमखाना मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्ण तयारी करण्यात आली असून कडक पोलीस बंदोबस्त व खाजगी सुरक्षेमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट खास आकर्षण ठरणार आहे.