केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे जयेंद्र रावराणे यांनी केले अभिष्टचिंतन | वाढदिवसासह पुढील राजकीय वाटचालीस दिल्या शुभेच्छा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 10, 2024 10:24 AM
views 272  views

वैभववाडी : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त जि.प.माजी वित्त व बांधकाम सभापती व वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर मंत्री राणे यांची भेट घेऊन श्री रावराणे यांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसासह पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस आहे.राणेंना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासून कार्यकर्ते मोठ्या संख्येने कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.जयेंद्र रावराणे यांनीही आज सकाळी मंत्री राणे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी निलमताई राणे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे उपस्थित होते.