
कुडाळ : कुडाळ येथे भारतीय जनता पक्ष आणि विशाल सेवा फाउंडेशन च्या वतीने 17 मार्चला होणाऱ्या शिवगर्जना या नाट्यप्रयोगाची तयारी कुडाळ डेपोच्या मैदानावर जोरदार सुरू आहे. या महानाट्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ठाकूर यांना विशाल परब यांनी दिल आहे. दरम्यान, या महानाटयास उपस्थित राहण्याचं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मान्य केलं आहे. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते.
17 मार्चला संध्याकाळी साडेपाच वाजता हा भव्य नाट्य सोहळा होणार आहे. भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग आणि विशाल सेवां फाउंडेशन यांच्यावतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवगर्जना या नाट्यप्रयोगाचा कोकणातला हा पहिला प्रयोग आहे. या नाट्यप्रयोगात सातशे कलाकार सहभागी होणार आहेत. या महानाट्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ठाकूर यांना विशाल परब यांनी दिल आहे. यावेळी दरम्यान, या महानाटयास उपस्थित राहण्याचं मंत्री अनुराग ठाकूर यांनी मान्य केलं आहे.