नेहरू युवा केंद्राच्या पडोस युवा संसद अंतर्गत युवकांनी घेतला संसदीय कामाचा अनुभव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 07, 2024 13:15 PM
views 42  views

देवगड :  नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून इंद्रप्रस्थ हॉल, देवगड  येथे पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत पडोस युवा संसद कार्यक्रम देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल  येथे श्री. एस. एच. केळकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज देवगड यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी युवांना मार्गदर्शन केले. 

        कार्यक्रमाचे उद्घाटन देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष श्रीम. साक्षी प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून निवडणूक नायब तहसीलदार, श्री. वाल्मिक विठ्ठल मोरे, देवगड पोलीस उपनिरीक्षक पी. एस. आय. समीर स. भोसले, पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समिती देवगड श्री विनायक विलास धुरी, देवगड कॉलेज प्राचार्य, डॉ. विजयकुमार कुनुरे, संरक्षण अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग ओरोस श्री कांबळे मिलन दत्तात्रय, देवगड कॉलेज उपप्राचार्य, डॉ. शरद शेटे, समन्वयक सांस्कृतिक विभाग, प्रा. श्रीकांत सिरसाठे, उद्योग निरिक्षक पंकज शेळके , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर उपस्थित होते.

          जिल्हा युवा अधिकारी, मोहित कुमार सैनी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले. यावेळी डी. एल. टी श्री. संदीप देसाई यांनी वोकल फोर लोकल या विषयावर देशातील प्रत्येक नागरिकाने लोकल वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादनं  खरेदी करावं तसेच नवनवीन व्यवसायाची माहिती देऊन युवांना या संदर्भात मार्गदर्शन केले . महिला बाल कल्याण विभागाचे संरक्षण अधिकारी श्री. कांबळे मिलन दत्तात्रय यांनी नारी शक्ती विषयावर भारतीय संस्कृतीत स्त्रिया शक्तीचे, शक्तीचे अवतार आहेत. देशातील प्रत्येक स्त्रीने तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. सशक्त, निरोगी आणि सशक्त, विकसितच्या दृष्टीसाठी त्यांचे योगदान सक्षम करण्यासाठी भारत नारी शक्ती फिटनेस रनचे उद्दिष्ट शक्तीला मुक्त करून स्वत:ची काळजी घेण्याची इच्छा जागृत करणे आहे असे मार्गदर्शन केले. यानंतर मॉक पार्लमेंटचे देखील आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत संसदीय कामकाज कशा प्रकारे चालते याचा अनुभव युवकांनी घेतला. त्यानंतर देवगड कॉलेज मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव नाचीवनेकर यांनी केले व माजी स्वयंसेवक, सहदेव पाटकर यांनी आभार मानले.