
सावंतवाडी : दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत लावला होता. हा बॅनर सावंतवाडी नगरपरिषदेकडून काढण्यात आला. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रथमच ही कारवाई आहे. यानंतर हिंदूत्वादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्याधिकारी , पोलिस निरीक्षकांना घेरल जाब विचारला. तसेच शहरातली सर्व अनधिकृत बॅनर हटवा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर रातोरात बॅनर हटाव मोहिम सुरू झाली. त्यामुळे सावंतवाडीन मोकळा श्वास घेतला. स्वच्छ अन् सुंदर सावंतवाडी पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.
तीनमुशी येथील अनधिकृत बॅनर हटवण्यास सुरूवात झाली. यावेळी मुख्याधिकारी अश्विनी पाटील, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी सिताराम गावडे, दिनेश गावडे, विनायक रांगणेकर, श्रीराम सावंत आदींसह हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राजकीय नेत्यांच्या बॅनर, होर्डिंग्जबाबत प्रशासन हिच भुमिका कायम ठेवणार की राजकीय दबावाला बळी पडणार हे पहावं लागेल.