मळेवाड - कोंडुरे ग्रा.पं. तर्फे महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत

Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 12:42 PM
views 48  views

सावंतवाडी : मळेवाड - कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे, यासाठी उज्वला गॅस योजना सुरु करण्यात केली या योजनेंअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड - कोंडुरेकडून गावातील ११ गरजू लाभार्थी महिलांना उपसरपंच हेमंत मराठे यांच्या सहकार्याने उज्वला गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.

यापूर्वीही मराठे यांच्या सहकार्याने गावातील १५ महिलांना उज्वला गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला होता. या वितरण प्रसंगी सरपंच मिनल पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी कुटुंबीय उपस्थित होते.