ठाकरे सेनेचा प्रचार वक्ता म्हणून स्वप्नील धुरी यांची निवड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 07, 2024 13:44 PM
views 371  views

वैभववाडी : विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे सेनेकडून प्रचार वक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाकरिता युवासेनेचे कणकवली विधानसभा सरचिटणीस स्वप्नील धुरी यांची निवड करण्यात आली आहे.पुढील दहा दिवस श्री.धुरी यांची तोफ जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात धडकणार आहे.

    विधानसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका सडेतोडपणे मांडण्यासाठी ठाकरे शिवसेनेकडून राज्यात प्रचार वक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याची यादी मातोश्रीवरून जाहीर झाली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वप्नील धुरी यांची निवड करण्यात आली. श्री.धुरी यांच्यावर लोकसभा निवडणुकीत ही जबाबदारी दिली होती. त्यांनी त्या निवडणुकीत सडेतोड भाषणे करून विरोधकांना घायाळ केले होते. आता पुन्हा या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली आहे.