
सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 13 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. जिल्हयात तीन सभा होणार आहेत.
या मध्ये पाहिली सभा सावंतवाडी गांधीचौक येथे 11.30 वाजता होणार आहे. दुसरी सभा कणकवली मतदारसंघाची सभा 2.30वाजता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या समोर होणार आहे. व तिसरी सभा मालवण येथे 4 वाजता टोपलीवाला हायस्कूल येथे होणार आहे. तसेच सुषमा अंधारी युवा नेतृत्वा आदित्य ठाकरे यांच्या पण सभा टप्प्याटप्प्याने होणार आहेत. यासाठी जय्यत तयारी केली जाणार आहे अशी माहिती शिवसेना नेते परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.