काशिम रमदुल यांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 28, 2024 11:32 AM
views 1096  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाल्यानंतर काशीम उर्फ रज्जब रमदुल यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव  उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.श्री.ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

  उंबर्डे येथील युवा नेते श्री.रमदुल यांची काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाली. निवड झाल्यानंतर श्री रमदुल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले.ठाकरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेचे काम अधिक जोमाने करा.पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा असं आवाहन श्री ठाकरे यांनी केले. यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.