खासदारकीचे उमेदवार विनायक राऊतच ; उद्धव ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱ्यावर !

वैभव नाईकांची माहिती
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 09, 2023 13:11 PM
views 671  views

सिंधुदुर्ग : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची महत्वाची बैठक मातोश्रीवर घेतली. या बैठकीत खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून लवकरच उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. 


 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत शिवसेना संघटनेचा त्यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात  होऊ दे चर्चा अभियान चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.


यावेळी शिवसेना सचिव  खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत,जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, संग्राम प्रभुगावकर, अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, बाबुराव धुरी, रुपेश राऊळ, शैलेश परब, राजू नाईक, सचिन सावंत, बंडू ठाकूर, उत्तम लोके, आदींसह सिंधुदुर्ग जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.