उद्धव ठाकरे नकली सेनेचे प्रमुख : अमित शहा

Edited by: विनायक गांवस
Published on: May 03, 2024 12:17 PM
views 447  views

रत्नागिरी :   हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार उद्धव ठाकरे नाहीत. तर त्यांचे खरे वारसदार नारायण राणे, एकनाथ शिंदे व राज ठाकरे आहेत. नकली शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत असा हल्लाबोल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी रत्नागिरीत ठाकरेंवर केल. नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत हे लक्षात घेऊन मतदान करा. मोदींनी कोकणला मंत्रीमंडळातला मंत्री उमेदवार म्हणून दिला आहे. इतर उमेदवारांना निवडून आल्यावर मंत्री करा असं कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं. मात्र, इथे उमेदवार म्हणून भाजपने मोठा चेहरा दिला आहे. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, मोदींचे हात बळकट करा असं आवाहन अमित शहा यांनी केल. रत्नागिरी येथे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, कोकण ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. याच भूमितून हिंदूत्वाची स्थापना  महाराजांनी केली. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर याच भूमितील आहेत. तीन भारतरत्न इथले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातील नारायण राणे माझे सहकारी असुन त्यांच्या प्रचारासाठी कोकणात आलोय. तर नकली शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे वीर सावरकरांच नाव घेण्याची हिंमत करतील का ? असा सवाल करत. तसं करणार नसतील तर शिवसेना चालवायची कसली हिंमत करता ? खरी शिवसेना तर एकनाथ शिंदेंची आहे असं मत व्यक्त केले. 

दरम्यान, नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे. देशाला समृद्ध करण्याची ही संधी असुन तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर अर्थव्यवस्थेत देश जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल. तर कश्मिर आमचं आहे की नाही ? असा सवाल करत मल्लिकार्जून खर्गेंना सांगा कश्मिरसाठी जीव देणारी माणसं या कोकणात आहेत. शरद पवार, कॉंग्रेस कंपनीनं ३७० कलम कुशीत घेऊन बसले होते. आम्ही ३७० कलम हटवलं. उद्धव ठाकरे ज्यांच्या चरणी गेले ते शरद पवार, राहुल गांधी त्यावेळी काय करत होते ? ३७० हटवायला विरोध त्यांनी केला. रक्ताच्या नद्या वाहतील असं गांधी म्हणाले. पाच वर्षात रक्त सोडा, दगड पण कुणी  उचलू शकले नाहीत. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच भल करू शकत नाही. शरद पवार, कॉंग्रेसच्या कुशीत ठाकरे बसलेत अशी टीका त्यांनी केली. तर पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या घरात घुसणारे मोदी सरकार आहे. 'सर्जिकल स्ट्राईक' करत नक्षलवादी आम्ही संपविले. अयोध्येत राम मंदिर भाजपनं बांधल. इतक्या वर्षांत जमलं नाही ते मोदींनी केलं. उद्धव ठाकरे राम मंदिर झालं हे चांगल झाल अस सांगितल का ? जाहीर सभेत बोलतील का ? ते बोलणार नाही कारण त्यांची 'वोट बँक' कॉंग्रेसची झालीय. तीन तलाक हटवलं त्याचं तरी ठाकरे समर्थन कराल का ? असा अमित शहांनी उद्धव ठाकरेंना खडा सवाल यावेळी केला. 

तर कॉंग्रेसच्या घोषणापत्राच ठाकरे समर्थन करतात का ? याच उत्तर द्याव‌ लागेल. हा   बाळासाहेबांचा वारसा नाही.  बाळासाहेबांचा खरा वारसा नारायण राणे, एकनाथ शिंदे, राज ठाकरेंकडे आहे. कोरोना सारख्या महामारीत राहूल गांधींनी राजकारण केलं. कोरोनाच्या खिचडीत ठाकरेंच्या साथीदारांनी भ्रष्टाचार केला. महाविकास आघाडीन हे काम केलं असा आरोप त्यांनी केला. तर कोकण रेल्वे, हवाई सेवा मोदींनी सुधारली, विविध योजनांचा फायदा मोदींनी जनतेला दिला. नारायण राणे यांनी विश्वकर्मा योजनेतून १३ हजार कोटीची  योजना दिली. बीनव्याजी, वीना तारण व्यावसायिक कर्ज दिली. ज्याचे गॅरंटर नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आता वेळ देशाला विकसित बनवायची आली आहे. जगात एक नंबरवर भारत  आणायचा आहे. हे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहूल गांधी करू शकतील का ? यांच्यातील पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? चुकून सत्तेत आले तर नेतृत्व करणार कोण ? असा चालणार का देश ? अस्थिर सरकारमुळे देशाच नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुमत असणार सरकार देशात पाहिजे. त्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप नसणारा, सुट्टी न घेणारा पंतप्रधान देशाला हवा असून नरेंद्र मोदीच देश सांभूळ शकतात, जगात नंबर एकला भारत घेऊन जाऊ शकतात‌. महाराष्ट्राच्या विकासासाठीही मोदी सक्षम आहेत. हिंदूंचा सन्मान ते करू शकतात. तर मोदींनी मंत्रीमंडळातला मंत्री तुम्हाला दिलाय. इतर उमेदवारांना निवडून आल्यावर मंत्री कराव लागत. मात्र, तुम्हाला उमेदवार म्हणून भाजपने मोठा चेहरा दिला आहे, जो मंत्रिमंडळात आहे‌. त्यामुळे नारायण राणेंना प्रचंड बहुमताने विजयी करा, मोदींचे हात बळकट करा असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी कोकणवासीयांना केल. याप्रसंगी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, आमदार कालिदास कोळंबकर, आ.शेखर निकम, आ.नितेश राणे, महिला अध्यक्षा चित्रा वाघ, शिवसेना नेते किरण सामंत, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले,आत्मनिर्भर देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असून त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर देश आणला. सर्वांगिण विकासासाठी ते काम करत आहेत. ५४ योजना देशातील जनतेला त्यांनी दिल्या आहेत. ४०० पार करताना मोदी देशाला  महासत्तेकडे घेऊन जातील.  माणूसकी हा एकच आमचा धर्म असून महिला, युवक, शेतकरी, गरिब हीच आमची जात आहे. आज २७ पक्षांची आमच्या विरोधात आघाडी आहे. लोकांच्या कोणत्याही प्रश्नावर ते विरोधक  बोलत नाही. केवळ मोदी, शहांवर तर राज्यात राणेंवर टीकेच काम करतात. दहा वर्षांत ठाकरेंच्या इथल्या खासदारान काय केल ? एक बालवाडी तरी सुरू केली का ? त्यामुळे विनायक राऊतला असा पाडा की परत उभा रहाता नये, त्यांच डिपॉझीट जप्त करा असा आवाहन नारायण राणेंनी केल. तर मोदींवर ठाकरे  नाहक टीका करत असून उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती ढासळळेली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदूत्वाशी गद्दारी केली. त्यांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये.

आम्हाला कोकणचा सर्वांगीण विकास करायचा आहे. पर्यटन, मत्स्य, शेती आदी माध्यमातून कॅलिफोर्नियाची लोक कोकणसारखा विकास करा बोलतील असं काम करायचं आहे. त्यासाठी भाजपला निवडून द्या, शिव्या देणारे काही करू शकत नाहीत. ४०० पार करताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार दिल्लीला पाठवा, कोकणच्या विकासासाठी मला साथ द्या असा आवाहन केंद्रीय मंत्री तथा उमेदवार नारायण राणे यांनी केलं. याप्रसंगी माजी आमदार बाळा माने, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.


सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत अधिकचं मताधिक्य देणार : मंत्री उदय सामंत

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ मताधिक्य देणार असूध रत्नागिरीतून सिंधुदुर्गपेक्षा अधिकच मताधिक्य देणार असा शब्द मंत्री उदय सामंत यांनी दिला. तर कोकणचा रोजगार व सहकार वाढविण्यासाठी सहकार मंत्री म्हणून न्याय द्यावा अशी मागणी केली. 

राणेंना मत म्हणजे विकासाला मत : चंद्रशेखर बावनकुळे

 नारायण राणेंनी ८० टक्के जीवन महाराष्ट्रासाठी समर्पित केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून घडलेलं हे नेतृत्व असून हा नेता कोकण, विदर्भासह मराठवाड्यासाठी झटणारा आहे. सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योगातून त्यांनी रोजगार दिले. २० लाखांपर्यंत बिनव्याजी व्यावसायिक कर्ज दिल. कॉंग्रेसन ६० वर्षांत काय केल ? मोदी सरकारनं २५ कोटी गरीबांची गरीबी दूर केली. देशात एकही रूपयाचा भ्रष्टाचार केला नाही. त्यामुळे नारायण राणेंना मत म्हणजे ३ कोटी लोकांना घर देणार मत, मोफत रेशन, आयुष्यमान कार्ड, पाच लक्ष विमा, १ कोटी सुर्यघर देणार ठरेल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

ठाकरेंच्या जाहीरातीत पॉर्न अॅक्टर सांगतोय महिलांवर होतो अत्याचार : चित्रा वाघ

'विकास की विनाश' ठरवायची ही वेळ आहे. अबकी बार ४०० पारची ही वेळ असून रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा त्यात असणार आहे. कोकण आणि राणे अभेद्य आहे. विनायक राऊतांनी दहा वर्षांत केलेल काम दाखवाव. मात्र,  राणेंनी कोकणचा विकास केला. त्यामुळे त्यांना दिल्लीत पाठवाव असं आवाहन केल. तर हिंदू द्वेषी, महाराष्ट्र द्वेषी ठाकरे झालेत. कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत. यांचे लोक महिलांवर पातळी सोडून बोलत आहेत. उद्धव ठाकरेंच्या जाहीरातीत पॉर्न अॅक्टर बापाच्या भूमिकेत आहेत‌. हा 'उल्लू'चा अॅक्टर सांगतोय महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यावर ठाकरे उत्तर देत नाहीत असा हल्लाबोल सौ. वाघ यांनी केला.