ठाकरे गटाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 17, 2024 13:42 PM
views 124  views

मालवण : आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने नांदरुख गावातील शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नांदरुख शाखेच्या वतीने १०वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 


आमदार वैभव नाईक यांच्या वतीने गेली १५ वर्षे वह्या वाटपाचा उपक्रम घेण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आ.वैभव नाईक सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत असतात. विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण इतर सोयी सुविधा मिळवून  देण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवितात. त्यांनी आपल्या आमदार फंडातून अनेक शाळांमध्ये सभामंडप बांधून दिला आहे. असे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

      

         यावेळी मालवण उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर , युवासेना उपशहर युवा अधिकारी अक्षय रेवंडकर, माजी सरपंच दिनेश चव्हाण, माजी सरपंच स्मिता पाटकर, माजी उपसरपंच सुहास राणे, शाखा प्रमुख समिर पाटकर, माजी उपसरपंच विकास चव्हाण, उपशाखा प्रमुख विनोद चव्हाण, नंदकिशोर चव्हाण, बूथप्रमुख गजानन चव्हाण, संपर्क प्रमुख विलास चव्हाण, अभय परब, संतोष चव्हाण, प्रमोद चव्हाण, सुशिल मोर्ये, गणेश भगत, संदिप कांबळी, सचिन गावडे, दिपक चव्हाण, सुधाकर पारधी, कविता चव्हाण, सलोनी पाटकर, मनिषा चव्हाण, वैभव पाताडे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.