
वेंगुर्ले : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मोठे यश मिळवले. उभादांडा जिल्हा परिषद मतदार संघातून संजय गावडे तर आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून विजय नाईक हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यानंतर दोन्ही विजयी उमेदवारांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्री वर भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, आमदार महेश सावंत, वेंगुर्ले तालुकाप्रमुख निलेश चमणकर, शहरप्रमुख शैलेश परुळेकर आदी उपस्थित होते.










