किरण सामंतांचा 'तो' निर्णय भावनिक : उदय सामंत

'रत्नागिरी - सिंधुदुर्ग'वर शिवसेनेचा दावा कायम
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 03, 2024 05:36 AM
views 1306  views

तिकीट वाटपामुळे शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी किरण सामंत यांनी ही  भूमिका घेतली होती. पण त्यानंतर मी रत्नागिरी सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. चार तारीख ला उद्या अकरा वाजता आमची बैठक रत्नागिरीला निवासस्थानी होणार आहे. जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत. त्यांना आपली जागा निश्चित कळल्यानंतर आपण दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येऊ शकतो तरी देखील मुख्यमंत्री शिंदे यांना उमेदवारीसाठी घासाघीस  करावी लागते या भावनेतून भावनिक होऊन तो घेतलेला निर्णय होता, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले 

आजही शिवसेना भाजपचा तो मतदार संघ आहेत आणि  शिवसेनेचाच दावा या मतदारसंघावर राहील असे देखील सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे संवेदशील आणि भावनाप्रधान व्यक्ती हाच या भागाचा विकास करू शकतो. त्यामुळे रात्री दहा वाजता त्यांनी फेसबुक व ट्विटर ही पोस्ट टाकली. पण त्यानंतर त्यांनी काही तासातच ते डिलीट देखील केलं. त्यामुळे  रत्नागिरी सिंधुदुर्ग ची जागा ही सेनेची असणार असा दावा देखील  मंत्री सामंत यांनी सांगितले.