मालवण शहरात उबाठाला धक्का

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 08, 2025 20:56 PM
views 193  views

मालवण : मालवण शहरात उबाठाला धक्का बसला असून अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर आमदार निलेश म्हणाले, जनतेची सेवा करत असताना जनतेला अपेक्षित विकासकामे पूर्ण करणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे. कोट्यावधी निधी या मतदार संघात प्राप्त झाला आहे. यापुढेही विकासनिधी कमी पडू देणार नाही. मालवण नगरपरिषद महाराष्ट्रात आदर्शवत आणि दर्जेदार अशी बनवणार असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. 

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरातील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी, नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार निलेश राणे यांनी पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपाजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, सहदेव बापार्डेकर, बाळू तारी, जॉन नरोना, जगदीश गांवकर, राजू बिडये, महेश सारंग, राजन परुळेकर, बाळू नाटेकर, शाम वाक्कर, अरुण तोडणकर, नारायण धुरी, भाऊ मोरजे, मंदार लुडबे, शिवाजी केळूसकर, आबा शिर्सेकर, संदीप भोजणे, ऋषिकेश सामंत, महिला जिल्हा संघटक अंजना सामंत, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, स्नेहा घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे व्हिजन असणारे नेतृत्व : आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन कुडाळ मालवण मतदार संघात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु आहे. मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास आमदार निलेश राणेच करू शकतात. व्हिजन असणारे ते कर्तृत्ववान नेतृत्व आहे. असं सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, व जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी निलेश राणे यांच्या कार्याचा गौरव केला. 

मालवण कुडाळ मध्ये शिवसेनाच नंबर एकचा पक्ष राहणार : जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिक काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात आहेत. शिवसेनेच्या कार्याची दखल सर्वांनाच घ्यावी लागेल असे कार्य आपण केलं पाहिजे. शिवसेना म्हणून आपण कुठेच कमी पडणार नाही. कुडाळ मालवणमध्ये शिवसेना नंबर एकचाच पक्ष राहणार असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. 

आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जनतेची सेवा करायची आहे : पूनम चव्हाण 

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात पुढील दहा ते 15 वर्षे काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. हे आमचे भाग्यच आहे. राणे कुटुंबाचे आशीर्वाद घेऊन जनतेची सेवा करण्याची आगामी निवडणूक लढवणार. जनतेसोबत आणि मतदारांसोबत नेहमीच मी प्रामाणिक राहणार असल्याचा शब्द देते. असे प्रवेशकर्त्या पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत :  यावेळी उबाठातील अनेक पदाधिकारी, नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात उबाठा तालुका समन्व्यक पूनम चव्हाण, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, माजी नगरसेविका निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, शाखाप्रमुख मोहन मराळ, शाखाप्रमुख दिगंबर बगाड, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चव्हाण, उपशहर प्रमुख बिलावर शेख, आनंद मालवणकर, माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण, ऋत्विक चव्हाण, वेदांत चव्हाण, नागेश चव्हाण, चंदन जाधव, साईल जाधव, संदेश डिकवलकर, श्रीकांत मालवणकर, भरत मालवणकर, शुभ्रा डिकवलकर, महेश कोळंबकर, चंद्रकांत जाधव, ग्रीश जाधव, रमेश कासले, महेश मालवणकर, गणेश मालवणकर, अमोल चाफेखोलकर, राहुल मोरे, सीमा कोळंबकर, माधुरी जाधव, शाली पेंडुरकर, नूतन मालवणकर, यश चव्हाण, श्रीकृष्ण चव्हाण, यासह अन्य नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.