पडेलमध्ये उबाठाला खिंडार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 09, 2026 22:36 PM
views 50  views

कणकवली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशामध्ये प्रतिक्षा माळगवे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर पाटणकर, विकास सोसायटी संचालक तानसेन पडेलकर, उबाठा शिवसेना शहरप्रमुख चंद्रशेखर सुतार, संपर्कप्रमुख व प्रचार प्रमुख राजेंद्र परब, भाकर माळगवे यांचा समावेश आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात भाजपाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. हा प्रवेश सोहळा ओरोस येथील पत्रकार भवनात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे, देवगड मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, पडेल सरपंच भूषण पोकळे आदी उपस्थित होते.