
कणकवली : महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, या मागणीसाठी शिवसेना उबाठा पक्षातर्फे सोमवार, ११ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात याच दिवशी सकाळी १०.३० वा. ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांच्यासह सेनेचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्गवासीयांसह उबाठा शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.