
देवगड : देवगड मधील साळशी गावातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनोज दिनकर नाईक, सौ. मनाली मनोज नाईक, महेश्वर मनोज नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला.
यावेळी आमदार नितेश राणे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, माजी सरपंच सत्यवान भोगले, मयुरेश भोगले, माजी सरपंच आकाश राणे, बूथ अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील कांडर, सुदर्शन उर्फ नागेश साळकर, प्रवीण राणे आदी भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते.