उबाठा शिवसेनेचा जोरदार प्रचार

विरोधकांसमोर उभं केलं आव्हान
Edited by: विनायक गांवस
Published on: November 23, 2025 15:23 PM
views 141  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांसह नगरसेवकांचा प्रचार करण्यासाठी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी मैदानात उतरत विरोधकांसमोर आव्हान उभं केलं आहे. 

प्रभाग क्रमांक ७ मध्ये पक्षाचे उमेदवार संदीप राणे आणि आर्य सुभेदार यांच्या प्रचार शुभारंभ त्यांनी केला. यावेळी विरोधकांवर त्यांनी टीका केली. जनता यावेळी निश्चित परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास श्री‌. राऊळ यांनी व्यक्त केला. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा मठकर म्हणाल्या, जनतेतून मिळणारा प्रतिसाद बघता माझा विजय निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी निशांत तोरसकर, आशिष सुभेदार, अशोक परब आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.