
वैभववाडी : उबाठा सेनेचे खांबाळे गावचे माजी उपसरपंच, युवा विभाग प्रमुख गणेश पवार, उपविभाग प्रमुख जयेश पवार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट तालुका सचिव गणेश पवार यांनी तसेच खांबाळे गावातील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे हा पक्षप्रवेश पार पडला. उबाठाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दिनेश पालकर, विक्रांत पवार, मिलिंद पवार, संदेश निगरे, सुशांत पाताडे, मंगेश पालकर, नरेश पालकर,संदीप जाधव, अमित कर्पे, परेश साईल, संदीप मोरे, साहिल गुरव, कमलेश पवार, राजू चव्हाण, सर्वेश पवार, मिथुन पवार, प्रमोदिनी पवार, रसिका पवार, रजनी पवार, वृषाली पवार, जयश्री पालकर, राजश्री पवार, सुहास सुतार, रवींद्र साळुंखे व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, संचालक दिलीप रावराणे व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच खांबाळे गावातील भाजपा पदाधिकारी महेश चव्हाण, लहू पवार, उमेश पवार, ज्ञानदेव पवार, अमोल चव्हाण, संकेत पवार, अक्षय पवार, मुकेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.