
वैभववाडी : तालुक्यातील खांबाळे गावातील उबाठाच्या ग्रामपंचायत सदस्या दर्शना मोरे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. मोरे यांच्यासोबत निर्मला पवार, दशरथ पारके, आरती सुतार मारुती पवार संगीता सुतार यांनी भाजपच कमळ हाती घेतले. यावेळी आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग बँक संचालक दिलीप रावराणे, मनोज रावराणे,दिलीप तळेकर, उमेश पवार ,लहू पवार, जयेंद्र पवार, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.