
पेडणे : कासारवर्णे येथे सकाळच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. यात एका तरुणीचा बळी गेला आहे.
कासारवर्णे येथे आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एक तरुणी दुचाकीवरून जात होती. त्याच भागातील श्यामसुंदर नाईक यांच्या घरासमोर दुसऱ्या एका दुचाकीला ओव्हरटेक करताना तिचा तोल गेला आणि दोन्ही वाहनांची जबर टक्कर झाली. यात ती तरुणी रस्त्यावर आपटली. यात तिचे डोके फुटल्याने बराच रक्तस्त्राव झाला. त्यामुळे अवघ्या काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पेडणे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते पंचनामा करत आहेत. तरुणीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.