राष्ट्रीय विधी सेवा दिनाच्या निमित्ताने दुचाकी रॅली..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 09, 2023 19:54 PM
views 103  views

सावंतवाडी : तालुका विधी सेवा समिती सावंतवाडी वकील बार संघटना तर्फे राष्ट्रीय विधी सेवा दिवस निमित्ताने दुचाकी वाहनावरून सावंतवाडी शहरात रॅली काढण्यात आली. न्यायालय परिसरातून याला प्रारंभ झाला. यावेळी दिवाणी न्यायाधीश क स्तर सावंतवाडी श्रीमती डी. पी. पुजारी  व सह दिवाणी न्यायाधीश  आर. जी. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत सावंतवाडी व वकील वर्ग व कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.