रस्त्यासाठी घोटगेतील दोघा ग्रामस्थांचं झेडपीसमोर उपोषण..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 10, 2023 15:40 PM
views 402  views

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायत हद्दीतील टेंबवाडी मुख्य रस्ता ते प्रवीण दळवी यांच्या घरासमोरून प्राथमिक शाळा घोटगे येथे जाणारा रस्ता ग्रामपंचायत रजिस्टर नंबर 26 वरील नोंदणी असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवा या मागणीसाठी प्रवीण विष्णू दळवी कानू मुकुंद दळवी यांनी जिल्हा परिषद ओरोस येथे आमरण उपोषण छेडले आहे. 

जोपर्यंत अतिक्रम हटत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, सदरील रस्त्याचे अतिक्रमण हटविण्यासाठी तब्बल 11 वेळा उपोषण केली. मात्र  प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, अतिक्रमण हटविणे बाबत ग्रामपंचायत कार्यवाही करत नाही. तर गटविकास अधिकारी यांच्याकडूनही याबाबत कोणतीही त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, या प्रकरणाची चौकशी करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.