फोंडाघाटात दोन ट्रक समोरासमोर धडकले

दोन जखमी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 14, 2025 21:04 PM
views 389  views

कणकवली : फोंडाघाट येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात एका ट्रकच्या चालक व दुसऱ्या ट्रकचा क्लीनर जखमी झाला. याबाबतची खबर आकाश सरदार कांबळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार ओंकार शिवानंद उदगट्टी (2१, रा. शिरगाव चिकोडी बेळगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा  अपघात 12 जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास फोंडाघाटातील पुनम हॉटेल नजीकच्या वळणावर झाला. दिनेश प्रकाश बेगडे (रा. करवीर - कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन फोंड्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. त्यादरम्यान त्यांच्या ट्रक फोंडा घाटातील पुनम हॉटेल मॅजिकच्या एका वळणावर आला असता समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या अपघातात दिनेश बेगडे यांच्या दोन्ही गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या ट्रक मधील क्लीनर शिवानंद उदगट्टी (रा.  चिकोडी बेळगाव) यांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर जखमी दिनेश याला कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

तेथे उपचार घेतल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्यात येत अपघाताची तक्रार दाखल केली. त्यानुसार ट्रक चालक ओंकार उदगट्टी याने आपल्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विरुद्ध दिशेने येऊन आमच्या ताब्यातील ट्रकला धडक दिली असे तक्रारीत म्हटले आहे.