
देवगड : देवगड तालुक्यातील खुडी येथे मिलींंद घाडी यांच्या गोठ्यावर आज सकाळी ०५.३० वाजता वीज पडून त्यांच्या दोन गुरांचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे.
देवगड तालुक्यातील मिलिंद घाडी रा.खुडी यांच्या गोठ्यावर ३ एप्रिल २०२५ला गुरुवारी पहाटेच्या ५.३०च्या वेळी कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे वीज पडून त्यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला. गोठयाचे सुध्दा नुकसान झालेले आहे. या घटनेची नोंद देवगड तहसील मध्ये करण्यात आली आहे.