
सावंतवाडी : आंबोली घाटकर वाडी परिसरात स्थिरावलेल्या हत्तीच्या हल्ल्यात घाटकरवाडी येथील वनकर्मचारी प्रकाश गोविंद पाटील (वय 54) यांना हत्तीने सोंडेने उचलून आपटल्याने आणि पाय दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घाटकरवाडी (ता.आजरा) घडली असल्याच बोलल जात. हा टस्कर हत्ती गेली काही वर्षे आंबोली हद्दीवर स्थिरावला आहे.