कंटेनर पलटी ; चालक जखमी

खारेपाटण नडगिवेतील घटना
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 30, 2024 07:47 AM
views 528  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी येथील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर पलटी झाला. गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनर चा 11:30 च्या सुमारास नडगिवे घाटात अपघात झाला.

या अपघातात कंटेनरचे नुकसान झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते आहे. अपघातात वाहन चालकाला दुखापत झाल्याची माहिती आहे. त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अपघाताची बातमी मिळताच खारेपाटण दुरक्षेत्रचे पोलीस कॉन्स्टेबल मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.