तुळस जि. प. मतदार संघात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात | महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती

Edited by: दिपेश परब
Published on: April 28, 2024 14:39 PM
views 109  views

वेंगुर्ले :  तुळस जिल्हापरिषद मतदार संघातील तुळस व मातोंड गावात आज महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील ग्रामदेवताना श्रीफळ ठेऊन रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. तुळस येथे श्री देव जैतीर व मातोंड येथे श्री देवी सातेरीला श्रीफळ अर्पण करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, शरदचंद्र चव्हाण, वैद्यकीय आघाडी चे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ संयोजक डॉ. अमेय देसाई, सावंतवाडी संस्थानचे राजे लखमराजे भोसले, भाजपा विधानसभा विस्तारक मोहन घुमे, राष्ट्रवादी चे नेते काका कुडाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, मकरंद परब, भाजपा महिला तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, माजी सरपंच शंकर घारे, भाऊ नाईक, संतोष शेटकर, उद्योजक सुधीर झांट्ये, उपसरपंच सचिन नाईक, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार राय, उपतालुकाप्रमुख परशुराम परब, खरेदी विक्री संघ  चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, भाजपा सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष राजु परब, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, ग्रा.पं.सदस्य राहुल प्रभु, दिपेश परब, सुजाता सावंत,वैभवी परब, किशोरी परब, आर्या रेडकर, मातोंड येथील प्रमुख गांवकर उदय परब, रमाकांत परब, सुभाष परब, भाजपा मातोंड गावप्रमुख सुधाकर परब, सुभाष सावंत, सुधीर मातोंडकर, गायेश परब, शेखर परब, भाजपा युवा मोर्चाचे प्रसाद नाईक यांच्यासाहित भाजप शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे, आरपीआय गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मानकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी बुथ निहाय प्रचाराचे नियोजन करण्यात आले.