सावंतवाडीत तुतारीच वाजणार

राष्ट्रवादीच्या महिलांचा दावा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 19, 2024 10:20 AM
views 865  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दावा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू  येत आहे तो म्हणजे अर्चना घारे-परब यांचा आहे. गेली 7 ते 8 वर्षे सातत्याने मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढत जन सामान्यांसाठी  अहोरात्र कार्य व मेहनत घेतली हे जनता विसरणार नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिलांनी केले आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अर्चना घारेंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये जनसामान्य जनतेची गर्दी पाहता त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती मिळत आहे. आज या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकरिता एका स्वच्छ चारित्र्याचा तसेच उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने असंख्य समस्यांवर काम करणारा एक नवीन चेहरा म्हणून नावलौकिक असलेल्या लोकनेत्या सौ. अर्चना घरे परब यांनाच महाविकास आघाडी मधून उमेदवारी मिळावी अशी सर्व महिला पदाधिकाऱ्यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य महिला भगिनींच्यावतीने मागणी आहे असे मत  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नितीशा नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी महिला शहराध्यक्ष ऍड. सायली दुभाषी,  युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. मारीता फर्नांडिस, सुधा सावंत, सौ. पूजा दळवी आदी उपस्थित होते