घाटात ट्रक पलटी ; कठड्यावर अडकला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 31, 2025 12:18 PM
views 362  views

वैभववाडी : करुळ घाटात सिमेंटचे पत्रे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. सुदैवाने संरक्षण कठड्यावर ट्रक स्थिरावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात बुधवारी रात्री झाला आहे. ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली. सध्या घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.