भुईबावडा घाटात ट्रक पेटला

भुईबावडा घाटातील वाहतूक ठप्प
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 06, 2023 18:55 PM
views 308  views

वैभववाडी:भुईबावडा घाटात बांबू वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली आहे.घाटातील वाहतूक ठप्प  झाली.सुमारे दोन लाखांचा माल गाडीत होता.ट्रकसहीत बांबू जळून सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे.सायकांळी ५.३० वा.च्या सुमारास ही घटना घडली.घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव ,उपनिरीक्षक प्रविण देसाई,प्रभारी कुलदीप पाटील,राहुल पवार आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.कणकवली ,येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे.