महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन २६ एप्रिलला

Edited by:
Published on: April 21, 2025 13:17 PM
views 199  views

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत गणेश मंगल कार्यालय भरणे खेड येथे शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय योगेश दादा रामदास भाई कदम त्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्याबरोबरच माजी आमदार संजयराव कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांची उपस्थिती लाभणार आहे. त्याचबरोबर खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक खेडचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत शिक्षक समितीचे राज्य सल्लागार विजयकुमार पंडित राज्य ऑडिटर अंकुश गोफणे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे जिल्हा नेते दिलीप महाडिक जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक सुनील दळवी जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सरचिटणीस धर्मपाल तांबे उपाध्यक्ष बबन साळवी अनिल यादव मुख्य संघटक संतोष यादव संघटना प्रवक्ता नेत्रदीप तांबे तालुका प्रसिद्धीप्रमुख शैलेश पराडकर दिलीप यादव डीसीपीएस प्रतिनिधी येडू केकान संतोष बर्वे नारायण शिरकर बबन मोरे संतोष चव्हाण अनिल मोरे अमर चव्हाण नवनीत घडशी तुकाराम काताळे संतोष मोरे दीपक कांबळे भागोजी कडव व सर्व शिक्षक समिती सभासद बंधू भगिनी मेहनत घेत आहेत. या त्रेवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर व दिलीप यादव यांनी केले आहे.