
देवगड : देवगड तालुक्यातील देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ,हनुमान युवक क्रीडा मंडळ,आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.भारत देशाच्या औद्योगिक,विज्ञान-तंत्रज्ञान,कृषि, व्यापार,वाहतूक आदी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा.रतन टाटा यांचे वयाच्या 87 वर्षी दुःखद निधन झाले. देशाचा एक अनमोल हिरा अनंतात विलीन झाला. अशा या महान व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना देवगड तालुक्यातील या विविध संघटनांच्या वतीने रतन टाटांविषयी मनातील भावना श्रद्धांजलीच्या रूपात व्यक्त करण्यात आली.
यावेळी देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांतजी साटम, महिला अध्यक्षl सौ. शामल जोशी, उपाध्यक्ष प्रदीप सावंत ,सुधीर मांजरेकर, रविकांत चांदोस्कर, सौ जान्हवी नादगोसावी, विजयकुमार जोशी परुळेकर सर , सावंत,अनिल खडपकर, बाबू सावंत, हेमंत करगुटकर , हनुमान क्रीडा मंडळ अध्यक्ष विलास रूमडे तसेच इतर मंडळाचे सुद्धा अध्यक्ष व सभासद तसेच देवगड ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.