RPD हायस्कूलमध्ये महात्मा गांधी - लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 13:06 PM
views 103  views

सावंतवाडी : सावंतवाडी आर. पी. डी हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने त्याच्या  प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वहाण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, काँग्रेस नेते ऍड. दिलीप नार्वेकर, शहर अध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, महिला प्रांतिक सदस्य विभावरी सुकी, ओबीसी सेल प्रांतिक सदस्य अमिदी मेस्त्री,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अभय मालवणकर,सेवादल तालुकाध्यक्ष संजय लाड,संदिप सुकी,भाऊसाहेब देसाई ,बबन डिसोजा,मिनीन गोम्स् ,आरुण नाईक ,कौस्तुभ पेडणेकर,प्रदिप चौगुले,संजय राउळ, माया चिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.