सम्यक फाऊंडेशनचे वतीने तुळशी येथे वृक्षारोपण कार्यक्रम

Edited by: मनोज पवार
Published on: August 17, 2025 19:37 PM
views 14  views

मंडणगड ( दि. 17):- स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने सम्यक फाऊंडेशन तुळशी यांच्यावतीने तुळशी येथे वृक्षारोपण व कृषी विषयक माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी सुनील खंदारे, तालुका कृषि अधिकारी सोमनाथ आहेरकर, मंडळ कृषि अधिकारी राकेश मर्चंडे, सहाय्यक कृषी अधिकारी शंकर चेके, महसुल मंडळ अधिकारी मनोहर पवार,  शाखा अभियंता देवकीनंदन सकपाळे, तुळशी ग्रामपंचायत प्रशासक पी. डी. गोसावी, ग्रामसेवक भास्कर लेंडे , चीफ इंजि.मुंबई महानगरपालिका  संजय जाधव, पोलीस पाटील रमेश जाधव यांच्यासह अधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,बौद्धसमाज सेवा संघ शाखा तुळशी क्र. 33  व महिला मंडळ, तुळशी बौद्धजन संघ मुंबई, सम्यक फाऊंडेशन तुळशी  चे पदाधिकारी व  सदस्य यांनी सहकार्य केले.