
चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ, चिपळूण यांच्या वतीने पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने महाराष्ट्र हायस्कूल ते स्विमिंग पूल रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत व चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून शुभारंभ करण्यात आले. उपक्रमासाठी चिपळूण नगरपरिषदेचे विशेष सहकार्य लाभले.
संघर्ष क्रीडा मंडळ हे केवळ कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमापुरते मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनासारख्या सामाजिक क्षेत्रातही सक्रियपणे काम करत आहे. मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात निसर्गप्रेमी कार्यकर्ते भाऊ काटदरे, नयन साडविलकर, सचिव मुन्ना कदम, विकास (भाऊ) पवार, रवी लवेकर, प्रदीप पवार, रुपेश महाडिक, अजित रेडीज, मधुकर पवार, विनोद पवार, बंटी घोरपडे, किशोर भोई, विशाल महाडिक, सनी जाधव, अमोल पवार यांनी हिरिरीने सहभाग घेतला. तसेच 'फ्रेंड्स फोरेव्हर ग्रुप'चे बंडोपंत आवले, आप्पा ओतारी, शेखर खेराडे, महेश वेविस्कर, राजा पाथरे, संजय साडविलकर, विरेन कोकाटे, विश्वास खाडीलकर, नितीन नलावडे, परिमल खातू यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमासाठी श्री क्लिनिकल लॅबोरेटरीचे संजय भागवत, चिपळूण नगरपरिषदेचे मंगेश पेंढामकर व बापू साडविलकर हेही उपस्थित होते.