नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 23, 2025 16:21 PM
views 52  views

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण करण्यात आले.भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.वृक्षाप्रमाणेच दिर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा आज वाढदिवस  जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. येथील रावराणे शिक्षण संकुलनात या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. प्रशालेच्या आवारात शोभेची झाडे, फुल झाडे, औषधी वनस्पतींची वृक्ष लागवड करण्यात आली.

वृक्षा प्रमाणे प्रदिर्घ आयुष्य व त्याच्या भव्य वाढ व विस्ताराप्रमाणे राजकीय वाटचाल मंत्री नितेश राणे यांची व्हावी असे मत वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. यावेळी  नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, आरोग्य शिक्षण व क्रीडा सभापती रोहन रावराणे , मुख्याध्यापक बी एस नादकर,पतंजली योग समिती वैभववाडीच्या पदाधिकारी, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.