
कुडाळ : ज्यांनी या गावात महिलांना असुरक्षित केले त्यांच्या विरोधात जनतेतून विरोधी लाट उसळली आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आता लोक घरी बसल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. पाच वर्षात हुमरस गावाला विकासाच्या मागे नेणारा सरपंचांना हुमरस गावची जनता आता कायमची घरी बसवेल.त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे.यामुळे हुमरस ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदासह सातही सदस्य मोठ्या विजयी होतील असा दावा या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सिताराम श्रीधर तेली यांनी केला आहे.. आपली निशाणी हार्मोनियम असून या निशाणी समोर बटन दाबून मोठ्या मतांनी विजयी करा.तसेच आपल्या पॅनलमधील सदस्य पदाचे उमेदवार यांच्या कप बशी, बस व शिलाई यंत्र या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या पॅनल मधील सातही उमेदवारांना विजयी करा असे आवाहन सिताराम तेली व जनार्दन कदम यांनी केले आहे.तीनही प्रभागात जोरदार प्रचार रॅली काढत या पॅनलने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.